नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हापूड येथे असाच एक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी डीआरआयच्या पथकाने एक कार थांबवली. दिसायला ही कार नॉर्मल असली तरी जेव्हा या कारच्या दरवाजामध्ये बनवलेली तिजोरी समोर आली तेव्हा नोटांचे बंडल पाहून अधिकारीही हैराण झाले.
एका कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड दिल्लीच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर टीमने छज्जरसी टोल प्लाझाजवळ एक कार थांबवली. या कारमध्ये सर्च ऑपरेशन सुरू होते तेव्हा आतमध्ये एका बॅगेत ३५ लाखांची रोकड सापडली. अधिकार्यांनी बारकाईने कारचा तपास केला तेव्हा दरवाजाच्या आत सीक्रेट तिजोरी बनवल्याचे कळले. या तिजोरीत नोटांचे बंडल लपवण्यात आले होते. ज्यात जवळपास २ कोटी ६५ लाख रोकड होती.
तपास अधिकार्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या नोटांचा स्त्रोत विचारला तेव्हा चालकाकडे कुठलेही अधिकृत पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर टीमने ही रक्कम जप्त केली आणि पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागाला माहिती दिली. आता या प्रकरणी आयकर विभाग पुढील तपास करत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहे. त्याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रक्कमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ने या पैशांचा आणि निवडणुकीचा अद्याप काही संबंध मिळाला नसल्याचं सांगितले. सध्या ही रक्कम कुणाची आहे आणि ती कुठे नेण्यात येत होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.